आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या साध्या घटनांमागील वैज्ञानिक कारणे काय असतात? मानवी शरीर कसे कार्य करते? आजार आणि उपचार यांचा विज्ञानाशी काय संबंध आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची उत्सुकता या पुस्तकातून निर्माण होते.
दैनंदिन जीवनातील प्रयोग, मानवी शरीर, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक आणि अफाट अंतराळ अशा विविध विषयांची माहिती सोप्या आणि रंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न यात केला आहे. विज्ञानातील नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देतानाच निरीक्षण, विचार आणि प्रयोग करण्याची वृत्ती विकसित करण्यास हे पुस्तक मदत करते.






Reviews
There are no reviews yet.