लहान वयात वडिलांचे छत्र हरपलेल्या उत्तरणला त्याची आई संन्यासी ब्रह्मचारी ठाकूर यांच्या आश्रमात समर्पित करते. आश्रमातील जीवनातून त्याच्यावर अध्यात्माचे संस्कार होतात; परंतु कठोर वास्तवाच्या धक्क्यामुळे त्याला एक दिवस आश्रम सोडावा लागतो. त्यानंतर अनसूया त्याला आश्रय देते आणि त्याच्या सेवेत स्वतःला समर्पित करण्याची इच्छा व्यक्त करते. वैराग्याचा मार्ग स्वीकारावा की संसारात प्रवेश करावा, या द्वंद्वात अडकलेल्या उत्तरणसमोर जीवनाचा महत्त्वाचा निर्णय उभा राहतो आणि तो अनसूयेशी विवाह करण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर त्यांच्या नात्याला मिळणारी नवी वळणे, निर्माण होणारे भावनिक आणि नैतिक पेच तसेच अध्यात्म आणि संसार यांचा समन्वय साधण्याचा त्याचा प्रयत्न लेखकाने प्रभावीपणे रंगवला आहे. संवादप्रधान शैलीत मांडलेली ही कादंबरी मानवी नातेसंबंध, श्रद्धा आणि आत्मशोध यांचा विचार करायला लावते.
कथा-कादंबरी
मंत्र
₹240.00
‘मंत्र’ ही बिनायक बंद्योपाध्याय यांची अध्यात्मिक धाटणीची कादंबरी आहे. पितृछत्र हरपलेल्या उत्तरणच्या आयुष्यात आश्रम, वैराग्य, प्रेम आणि संसार यांतील संघर्ष उलगडत जातो. ईश्वर, कर्तव्य आणि मानवी नात्यांमधील समतोल शोधणाऱ्या एका ‘संसारी संन्याशा’चा हा अंतर्मुख प्रवास आहे.
Availability: 10 in stock
Category: कथा-कादंबरी






Reviews
There are no reviews yet.