राजमाता जिजाऊसाहेब या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माताच नव्हत्या, तर स्वराज्याच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कुशल प्रशासक, दूरदृष्टीच्या मार्गदर्शक आणि कणखर व्यक्तिमत्त्वाच्या स्त्री होत्या. शिवरायांच्या बालपणी त्यांनी पुणे जहागिरीची व्यवस्था उत्तम प्रकारे सांभाळली. शत्रूच्या अत्याचारांमुळे भयभीत आणि निराधार झालेल्या रयतेला आधार देऊन परिसरात शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले.
शिवाजी महाराज मोठे झाल्यानंतरही जिजाऊसाहेब त्यांच्यासाठी महत्त्वाच्या सल्लागार होत्या. कठीण प्रसंगी त्यांना आपल्या मातेच्या मार्गदर्शनाचा आधार मिळत असे. शिवराय आग्र्याला गेले असताना जिजाऊसाहेबांनी स्वराज्याचा कारभार समर्थपणे सांभाळला आणि स्वराज्याची सुरक्षितता जपली.






Reviews
There are no reviews yet.