भारतीय राज्यघटना

₹475.00

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतून उदयास आलेल्या राज्यघटनेचा इतिहास, तिच्यामागील विचार आणि सामाजिक परिवर्तनातील तिची भूमिका स्पष्ट करणारा हा अभ्यासपूर्ण ग्रंथ आहे. सरनामा, मूलभूत हक्क, राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत रचना सिद्धांत यांच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व यात उलगडले आहे.

Availability: 10 in stock

भारतीय राज्यघटना ही विसाव्या शतकातील भारताच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक परिवर्तनातील एक महत्त्वाची घटना आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील संघर्ष आणि विचारप्रवाहांतून तिची निर्मिती झाली. काही घटनात्मक तरतुदींवर पाश्चात्त्य विचारांचा प्रभाव असला, तरी भारतीय समाजातील रूढीवादाला आव्हान देऊन आधुनिक, समताधिष्ठित समाजाची दिशा दाखवणारी तिची मूल्यव्यवस्था हा या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे.

डॉ. प्रकाश पवार यांनी संपादित केलेला हा ग्रंथ राज्यघटनेच्या आत्म्याचा आणि तिच्यामागील प्रेरणांचा वेध घेतो. सरनामा, मूलभूत हक्क, राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत रचना सिद्धांत या महत्त्वाच्या घटकांच्या आधारे राज्यघटना नागरिकांना कोणती मूल्ये देते आणि समाजपरिवर्तनासाठी कशी प्रेरणा देते, हे समजावून सांगितले आहे.

Author

डॉ. प्रकाश पवार

Publisher

मनोविकास प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय राज्यघटना”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top