चिन्मय, त्याचे आई-वडील, मैत्रीण, सामाजिक कार्यकर्ते तसेच ट्विटर, व्हॉट्सअॅप, ‘लोकमत’ आणि कारसेवेसाठी गेलेली एक वीट अशा विविध कथनकर्त्यांच्या माध्यमातून कथानक पुढे सरकते. रहस्यकथेच्या ओघात कादंबरी गुंतागुंतीच्या सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीचे विश्लेषण करते. धार्मिक कट्टरतेच्या वाढत्या प्रभावात समाज कोणती उदारमतवादी आणि सहिष्णू मूल्ये गमावत आहे, याचा विचार ती मांडते. हिंदू-मुस्लिम अस्मितांच्या पलीकडे जाऊन सामायिक सांस्कृतिक वारसा आणि भारतीयत्वाचा अर्थ शोधणारी ही कादंबरी सहजीवनासाठी पारंपरिक लोकधर्मासोबत आधुनिक मूल्यांची गरजही अधोरेखित करते.
कथा-कादंबरी
मनसमझावन
₹375.00
ही रहस्यप्रधान कादंबरी अनेक व्यक्तिरेखा, लालबाबाचा दर्गा, म्हसोबा, दखनी भाषा आणि समाजमाध्यमांच्या कथनांतून उलगडत जाते. धार्मिक कट्टरतेच्या पार्श्वभूमीवर हिंदू-मुस्लिम सहजीवन आणि भारतीयत्वाचा शोध घेणे हा कादंबरीचा मुख्य आशय आहे.
Availability: 10 in stock
Category: कथा-कादंबरी
| Author | संग्राम गायकवाड |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |
Be the first to review “मनसमझावन” Cancel reply






Reviews
There are no reviews yet.