जगाच्या इतिहासात काही व्यक्तींनी आपल्या असामान्य प्रतिभेने, जिद्दीने आणि अथक परिश्रमांनी कायमचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कल्पना, शोध, कलाकृती आणि सामाजिक कार्यामुळे मानवी जीवनाला नवी दिशा मिळाली. दीपा देशमुख लिखित ‘दिग्गज १’ या पुस्तकातून अशाच कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनाचा आणि कार्याचा प्रेरणादायी प्रवास वाचकांसमोर उलगडतो.
साहित्य, कला, विज्ञान, गणित, स्थापत्यकला, चित्रकला, शिल्पकला, संगीत, समाजकारण आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांच्या योगदानाची ओळख या पुस्तकातून होते. त्यांच्या आयुष्यातील ध्येय, कल्पकता, संघर्ष आणि कामाप्रती असलेली समर्पित वृत्ती यांतून मोठे कार्य घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची जाणीव होते. त्यांच्या प्रयत्नांनी जग कसे बदलले आणि त्यांच्या योगदानाचा समाजावर कसा परिणाम झाला, हे समजून घेण्याची संधी वाचकांना मिळते.






Reviews
There are no reviews yet.