कोकणभूमीने भारताला अनेक कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे दिली आहेत. ‘कोकणरत्ने’ या पुस्तकातून डॉ. नीलम प्र. नाईक आणि डॉ. प्रमोद वा. नाईक यांनी अशाच दहा महान व्यक्तींच्या कार्याचा आणि योगदानाचा वेध घेतला आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महर्षी धोंडो केशव कर्वे, नामदार गोपाळ कृष्ण गोखले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध क्षेत्रांत ठसा उमटवलेल्या व्यक्तिमत्त्वांचा यात समावेश आहे. त्यांच्या कार्यातून भारताच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहासाची ओळख होते. या महान व्यक्तींचे विचार, कर्तृत्व आणि समाजासाठीचे योगदान वाचकांना प्रेरणा देतात. विद्यार्थी, शिक्षक, पालक, इतिहासाचे अभ्यासक आणि कोकणच्या वैभवाबद्दल जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे आहे.
माहितीपूर्ण
कोकणरत्ने
₹175.00
कोकणभूमीत जन्मलेल्या आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने भारताच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या दहा महान व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून देणारे हे पुस्तक आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या या कोकणरत्नांची प्रेरणादायी जीवनगाथा नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देते.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. नीलम प्र. नाईक आणि डॉ. प्रमोद वा. नाईक |
|---|---|
| Publisher | मनोविकास प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.