रेल्वे ही केवळ प्रवासाचे साधन नसून आधुनिक जगाच्या विकासाची आणि मानवी जीवनातील बदलांची साक्षीदार आहे. या पुस्तकातून रेल्वेच्या उगमापासून आजच्या वेगवान रेल्वे व्यवस्थेपर्यंत झालेल्या रोमांचक प्रवासाची ओळख करून दिली आहे. रेल्वे इंजिन, रूळ, पूल, स्थानके, फलाट, डब्यांची रचना आणि प्रवाशांसाठीच्या सोयी-सुविधांच्या विकासाचा यात आढावा घेतला आहे. भारतीय रेल्वेने विविध जाती, धर्म आणि आर्थिक स्तरांतील लोकांना एकत्र आणत सामाजिक व सांस्कृतिक जीवनातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रेल्वेप्रवासाची आवड असलेल्या एका जिज्ञासू मुशाफिराच्या अनुभवांतून उलगडणारी ही सफर रेल्वेप्रेमी, विद्यार्थी आणि तंत्रज्ञान व इतिहासात रस असलेल्या वाचकांसाठी ज्ञानवर्धक आणि मनोरंजक ठरते.
माहितीपूर्ण
रेल्वेची रंजक सफर
₹250.00
रेल्वेच्या सुमारे दोनशे वर्षांच्या इतिहासाचा, तिच्या तांत्रिक विकासाचा आणि मानवी जीवनाशी जोडलेल्या नात्याचा वेध घेणारे रंजक पुस्तक. वाफेच्या इंजिनापासून मेट्रो आणि बुलेट ट्रेनपर्यंतच्या रेल्वेच्या प्रवासाची माहिती यातून मिळते.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. अविनाश वैद्य |
|---|---|
| Publisher | मनोविकास प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.