महाराष्ट्रातील साखर उद्योगात ऊसतोडणी कामगारांचे मोठे योगदान आहे. मात्र, हंगामासाठी कुटुंबासह स्थलांतर करावे लागत असल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडतो आणि अनेक मुले शाळेपासून दूर राहतात. पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ‘टीम आशा’ने अशा मुलांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. मुलांचे सर्वेक्षण, शाळेत प्रवेश मिळवून देणे आणि स्थलांतरामुळे शिक्षणात येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधणे या कामातून कार्यकर्त्यांना अनेक अनुभव आले. ‘शिक्षणकोंडी’ या पुस्तकात शाळेत जाण्याची स्वप्ने पाहणारी मुले, उदरनिर्वाहासाठी आई-वडिलांना मदत करणारी बालके आणि अडचणींवर मात करून मुलांना शिकवू पाहणारे पालक यांच्या वास्तवदर्शी कहाण्या मांडल्या आहेत. स्थलांतरित कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यावरील उपायांचा विचार करण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
सामाजिक
शिक्षणकोंडी
₹150.00
ऊसतोडणी कामगारांच्या स्थलांतरामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांच्या समस्या आणि त्यांना पुन्हा शालेय प्रवाहात आणण्यासाठी ‘टीम आशा’ने केलेल्या प्रयत्नांची अनुभवाधारित मांडणी.
Availability: 10 in stock






Reviews
There are no reviews yet.