मूळतः एक होती राणी या नावाने लिहिलेले हे नाटक रंगभूमीवर एक होती वाघीण या नावाने आले. एकाधिकारशाही आणि जनशक्ती यांच्यातील संघर्षासोबतच कला आणि प्रीती यांचे व्यक्तीच्या तसेच समाजाच्या जीवनातील महत्त्व लेखकाने मनोरंजक पद्धतीने मांडले आहे. शिरवाडकरांच्या प्रतिभेतून निर्माण झालेली कथावस्तू आणि समूहगीत व गणगीतांच्या माध्यमातून केलेला संगीताचा वेगळा प्रयोग हे नाटकाचे विशेष आहेत. शिरवाडकर जन्मशताब्दी विशेष आवृत्तीत संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांनी निर्मितीतील अनुभव मांडले असून, पहिल्या प्रयोगाशी संबंधित कलाकारांच्या आठवणीही समाविष्ट आहेत.
नाटक
एक होती वाघीण
₹210.00
एक होती वाघीण हे वि. वा. शिरवाडकर यांचे नाटक असून, एकाधिकारशाहीविरुद्ध जनशक्तीचा संघर्ष हा त्यातील महत्त्वाचा विषय आहे. कला, प्रेम आणि समाजजीवनातील त्यांच्या स्थानाचा वेध घेताना नाटकात संगीताचाही अभिनव वापर केला आहे.
Availability: 10 in stock
| Author | वि. वा. शिरवाडकर |
|---|---|
| Publisher | पॉप्युलर प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.