चला, करोडपती होऊया!

₹299.00

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे. पैशांचे व्यवस्थापन, बचत, गुंतवणूक, मुलांच्या शिक्षणाचे नियोजन, निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता आणि संपत्ती निर्मिती यांविषयी सोप्या भाषेत माहिती देणारे हे पुस्तक प्रत्येक महिलेसाठी उपयुक्त आहे.

Availability: 10 in stock

आर्थिक स्वावलंबन हे महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्वाचे साधन आहे. घरात येणाऱ्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करणे, खर्च आणि बचत यांचा समतोल राखणे तसेच भविष्यातील गरजांचा विचार करून आर्थिक नियोजन करणे आवश्यक असते. ‘चला, करोडपती होऊया!’ या पुस्तकातून अनिल पाटील महिलांना पैशांच्या जगाची ओळख करून देतात आणि आर्थिक शहाणपणाचे महत्त्व समजावून सांगतात.

पुस्तकाच्या पहिल्या विभागात आर्थिक व्यवहार, पैशांचा प्रवाह, आर्थिक साक्षरता आणि कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाची माहिती दिली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी निधी उभारणे, कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन खर्चाचे नियोजन करणे आणि अनपेक्षित संकटांसाठी आर्थिक तरतूद ठेवणे यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा यात समावेश आहे.

Author

अनिल पाटील

Publisher

मनोविकास प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चला, करोडपती होऊया!”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top