आर्थिक स्वावलंबन हे महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्वाचे साधन आहे. घरात येणाऱ्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करणे, खर्च आणि बचत यांचा समतोल राखणे तसेच भविष्यातील गरजांचा विचार करून आर्थिक नियोजन करणे आवश्यक असते. ‘चला, करोडपती होऊया!’ या पुस्तकातून अनिल पाटील महिलांना पैशांच्या जगाची ओळख करून देतात आणि आर्थिक शहाणपणाचे महत्त्व समजावून सांगतात.
पुस्तकाच्या पहिल्या विभागात आर्थिक व्यवहार, पैशांचा प्रवाह, आर्थिक साक्षरता आणि कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाची माहिती दिली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी निधी उभारणे, कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन खर्चाचे नियोजन करणे आणि अनपेक्षित संकटांसाठी आर्थिक तरतूद ठेवणे यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा यात समावेश आहे.






Reviews
There are no reviews yet.