चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाला विचार करायला लावणारे आणि मानवी जीवनाचे विविध पैलू उलगडणारे प्रभावी माध्यम आहे. चित्रपटातील कथा, पात्रे आणि प्रसंग प्रेक्षकांच्या मनावर खोलवर परिणाम करतात. या सगळ्यामागे दिग्दर्शकाची सर्जनशीलता, कल्पकता आणि दूरदृष्टी महत्त्वाची असते.
दीपा देशमुख लिखित ‘डायरेक्टर्स’ या पुस्तकात सत्यजित रे, व्ही. शांताराम, राज कपूर, बिमल रॉय, गुरुदत्त, हृषिकेश मुखर्जी आणि श्याम बेनेगल यांसारख्या निवडक दिग्गज दिग्दर्शकांच्या कार्याचा परिचय करून दिला आहे. त्यांच्या चित्रपटांचा दृष्टिकोन, त्यांना आलेल्या अडचणी आणि त्यांनी चित्रपटसृष्टीत निर्माण केलेले वेगळेपण यांचा यात वेध घेतला आहे.






Reviews
There are no reviews yet.