अणू हा पदार्थाचा सूक्ष्म घटक असल्याच्या शोधापासून सुरू झालेला वैज्ञानिक प्रवास पुढे अणूच्या विभाजनापर्यंत आणि त्यातून अणुबॉम्बच्या निर्मितीपर्यंत कसा पोहोचला, याची उत्कंठावर्धक कहाणी या पुस्तकात वाचायला मिळते. किरणोत्सर्जनाचा शोध, अणूतील प्रचंड ऊर्जा आणि आइन्स्टाईनच्या समीकरणातून स्पष्ट झालेली ऊर्जेची संकल्पना यांसारख्या वैज्ञानिक घडामोडींचा लेखकाने वेध घेतला आहे.
या प्रवासात सहभागी झालेले शास्त्रज्ञ, त्यांचे संशोधन, त्या काळातील राजकीय परिस्थिती आणि तंत्रज्ञानातील प्रगती यांचे महत्त्व पुस्तकातून स्पष्ट होते. अणुबॉम्बच्या निर्मितीनंतर जागतिक राजकारणात घडलेले बदल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावाचेही यात विवेचन आहे.






Reviews
There are no reviews yet.