डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीतील त्यांचे योगदान समजून घेण्यासाठी ‘दूरदर्शी आंबेडकर’ हे पुस्तक महत्त्वपूर्ण आहे. लेखक अनुराग भास्कर यांनी या पुस्तकातून डॉ. आंबेडकर यांच्या परिवर्तनकारी कार्यातील विविध पैलू उलगडून दाखवले आहेत.
भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून डॉ. आंबेडकरांना मिळालेला सन्मान, त्यामागील ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्यांच्या बौद्धिक कार्याचे महत्त्व यांचा या पुस्तकात सविस्तर वेध घेतला आहे. अस्सल ऐतिहासिक स्रोतांचा आधार घेत अनेक प्रचलित समजुतींची पडताळणी करून डॉ. आंबेडकरांचे कार्य अधिक स्पष्टपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.






Reviews
There are no reviews yet.