भारतीय संसद ही देशाच्या लोकशाही व्यवस्थेतील एक महत्त्वाची संस्था आहे. १९२१ ते १९२७ या काळात बांधण्यात आलेली जुनी संसद भवनाची भव्य, गोलाकार वास्तू भारतीय इतिहासाची आणि लोकशाहीच्या जडणघडणीची साक्षीदार राहिली आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात या ऐतिहासिक वास्तूतून संसदेचे कामकाज चालत होते.
२०२३ पासून संसदेचे कामकाज नव्या संसद भवनातून सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, हे पुस्तक जुन्या संसद भवनाचा इतिहास आणि तिचे महत्त्व समजावून सांगते. संसद कशी कार्य करते, संसदीय कामकाजाचे स्वरूप काय असते आणि भारतीय लोकशाहीत संसदेची भूमिका किती महत्त्वाची आहे, यांची प्राथमिक ओळख यातून मिळते.






Reviews
There are no reviews yet.