डोईचा पदर आला खांद्यावरी…

₹280.00

सत्तरीच्या दशकातील एका तरुणीची ही हृदयस्पर्शी कथा आहे. तरुण वयातील एका क्षणिक चुकीमुळे तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. स्वतःच्या आकांक्षा बाजूला ठेवून, मनातील वेदना लपवत ती परिस्थितीशी झुंज देत जगत राहते. तिचा अंतर्मनातील संघर्ष, दुःख आणि त्यातून मार्ग शोधण्याची धडपड या कथेतून उलगडते.

Availability: 10 in stock

सत्तरीच्या दशकातील एका तरुणीच्या आयुष्याभोवती गुंफलेली ही भावस्पर्शी कथा आहे. ओढाळ तरुण वयात मोहाच्या एका धूसर क्षणी तिच्याकडून अनवधानाने एक चूक घडते आणि त्या एका घटनेमुळे तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळते. तिच्या स्वप्नांचा, आकांक्षांचा आणि इच्छांचा मार्ग बदलून जातो.

स्वतःच्या मनातील वेदना आणि भावनांचा पाणपडदा डोळ्यांआड लपवत ती आयुष्य जगत राहते. मनातील अस्वस्थता, अंतरीचा पीळ आणि परिस्थितीशी सुरू असलेला संघर्ष यांत ती सतत होरपळत असते. स्वतःच्या दुःखाशी झुंज देत, आयुष्याने उभ्या केलेल्या प्रश्नांना सामोरी जाणाऱ्या या तरुणीचा भावनिक प्रवास वाचकाला अंतर्मुख करतो.

Author

डॉ. छाया महाजन

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डोईचा पदर आला खांद्यावरी…”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top