जगभरातील गिर्यारोहकांना आकर्षित करणारे शिखर म्हणजे कांचनजंगा! त्याचे विलोभनीय सौंदर्य जितके मोहक, तितकीच त्यावर चढाई करणे खडतर आणि आव्हानात्मक. ‘गिरिप्रेमी’च्या दहा गिर्यारोहकांनी हे आव्हान स्वीकारून अनेक विक्रम नोंदवत मोहीम यशस्वी केली. या यशामागे केवळ शारीरिक क्षमता नव्हे, तर कठोर मानसिक तयारी, आर्थिक नियोजन, संघभावना आणि ध्येय साध्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती होती. ही मोहीम साहस आणि पराक्रमाची कहाणी असली, तरी तिच्यात अपार मानवतेचा आणि निसर्गसंवर्धनाबद्दलच्या जागरूकतेचाही महत्त्वपूर्ण संदेश आहे. निष्णात गिर्यारोहक भूषण हर्षे आणि या मोहिमेचे नेते, ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी या थरारक अनुभवाचे रोचक वर्णन केले आहे. आव्हानांवर मात करण्याची जिद्द, सहकाऱ्यांवरील विश्वास आणि निसर्गाप्रती असलेली संवेदनशीलता यांचा प्रत्यय देणारे ‘शिखररत्न कांचनजुंगा’ हे पुस्तक गिर्यारोहणप्रेमींसह साहसकथा वाचणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरते.
प्रवास
शिखररत्न कांचनजुंगा
₹300.00
जगातील आव्हानात्मक शिखरांपैकी एक असलेल्या कांचनजंगावर यशस्वी चढाई करणाऱ्या ‘गिरिप्रेमी’च्या दहा गिर्यारोहकांच्या साहसी मोहिमेची ही थरारक कहाणी आहे. शारीरिक आणि मानसिक तयारी, जिद्द, विजिगीषू वृत्ती, मानवता आणि निसर्गसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या या मोहिमेचे रोचक वर्णन भूषण हर्षे आणि ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी केले आहे.
Availability: 10 in stock
| Author | उमेश झिरपे ,भूषण हर्षे |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.