आज जगातील प्रमुख महानगरांपैकी एक असलेल्या लंडनचा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे. व्यापार आणि उद्योगांच्या वाढीमुळे लंडनमध्ये संपन्नता आली; मात्र त्याचबरोबर गुन्हेगारी, खून, मारामाऱ्या, रोगराई आणि दारिद्र्य यांसारख्या समस्याही वाढल्या. एकेकाळी बकाल होत चाललेल्या या शहराचा पुढे दूरदृष्टी असलेल्या व्यक्ती आणि संस्थांनी कायापालट घडवून आणला. मानवी सर्जनशीलता, बुद्धिमत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने लंडनने आधुनिक महानगर म्हणून आपली ओळख निर्माण केली. ‘लंडननामा’ या पुस्तकातून या पहिल्या ‘ग्लोबल सिटी’च्या सुमारे दोन हजार वर्षांच्या जडणघडणीचा वेध घेतला आहे. शहराच्या विकासातील महत्त्वाचे टप्पे, त्याला सामोरे जावे लागलेली आव्हाने आणि काळानुसार घडत गेलेले परिवर्तन यांची रंजक कहाणी या ग्रंथात वाचायला मिळते. एका शहराचा इतिहास सांगतानाच मानवी कल्पकता, नियोजन, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या बळावर नागरी जीवनाचा कायापालट कसा घडू शकतो, याचीही जाणीव करून देणारे हे पुस्तक आहे.
प्रवास
लंडननामा
₹350.00
‘लंडननामा’ हा दोन हजार वर्षांच्या लंडनच्या प्रवासाचा वेध घेणारा ग्रंथ आहे. व्यापार-उद्योगाच्या भरभराटीपासून गुन्हेगारी, रोगराई आणि बकालपणाच्या संकटांपर्यंतचा काळ अनुभवत दूरदृष्टी, मानवी सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाच्या बळावर जागतिक महानगर म्हणून विकसित झालेल्या लंडनची रंजक कहाणी या पुस्तकातून उलगडते.
Availability: 10 in stock
| Author | सुलक्षणा महाजन |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.