‘आडगार’ ही महादेव मोरे यांची ग्रामीण जीवनातील कटू वास्तवाचे चित्रण करणारी कादंबरी आहे. व्यसनाधीन वडील, अत्यंत गरिबी आणि आईचे कष्ट यांमुळे अंशीचे बालपण, शिक्षण आणि तारुण्य उद्ध्वस्त होते. विवाहित किराणा दुकानदार बापूच्या प्रेमात पडलेल्या अंशीची फसवणूक होते आणि पुढे गावातील स्वार्थी व्यक्तींच्या कारस्थानांमुळे तिचे आयुष्य अधिकच बिकट बनते. पैशांचे आमिष दाखवून तिला मुंबईतील वेश्याव्यवसायात विकले जाते. संकटांच्या गर्तेत सापडलेल्या अंशीच्या आयुष्याला योग्य दिशा मिळते का, याचा वेध घेणारी ही वास्तववादी आणि मन हेलावून टाकणारी कादंबरी आहे.
लघुकथा
आडगार
₹230.00
ग्रामीण जीवनातील दारिद्र्य, व्यसनाधीनता, प्रेमातील फसवणूक आणि स्त्रीच्या संघर्षाचे वास्तव मांडणारी कादंबरी. परिस्थितीच्या विळख्यात सापडलेल्या अंशीच्या वेदनादायी आयुष्याची हृदयस्पर्शी कहाणी.
Availability: 10 in stock
| Author | महादेव मोरे |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.