रक्त हे मानवी शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. शरीरभर अखंडपणे वाहत राहून ते अनेक आवश्यक प्रक्रिया पार पाडते आणि शरीराच्या विविध भागांपर्यंत ऑक्सिजन व पोषक घटक पोहोचवण्यास मदत करते. ‘आपलं रक्त’ या पुस्तकातून लेखिका डॉ. मानसी राजाध्यक्ष यांनी रक्ताचे महत्त्व आणि त्याच्या कार्याची ओळख करून दिली आहे.
रक्त नेमके कशापासून बनलेले असते, त्यातील विविध घटक कोणते, शरीरात रक्ताची निर्मिती कुठे होते आणि त्याचा शरीरभर प्रवास कसा चालतो, अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून मिळतात. आपण घेत असलेले अन्न, त्यातून मिळणारी ऊर्जा आणि श्वसनातून शरीरात जाणारा ऑक्सिजन यांचा रक्ताशी असलेला संबंधही यात समजावून सांगितला आहे.






Reviews
There are no reviews yet.