लग्न जमवण्याची प्रक्रिया, लग्नसमारंभातील धांदल आणि धावपळ, वऱ्हाडी मंडळींचा लुडबुडखोर स्वभाव आणि त्यांच्या आगाऊपणातून घडणारे गमतीशीर घोटाळे अशा प्रसंगांतून ज्युनियर ब्रह्मे विनोदाचे अनोखे विश्व उभे करतात. विनोदाच्या साचेबद्ध पठडीला छेद देत ते विक्षिप्त, काहीसे आचरट वाटणारे, पण निरागस आणि निष्पाप विनोद सादर करतात. स्वतःच्याच विश्वात रमणारी मध्यवर्ती व्यक्तिरेखा आणि तिच्या वागण्यातून निर्माण होणारे स्वनिंदात्मक विनोद या लेखनाला वेगळी खुमारी देतात. कधी सहज केलेली कोटी, तर कधी नकळतपणे केलेली सूक्ष्म मिस्कील टिप्पणी वाचकाला अचानक हसवते. एखादा विनोद लगेच लक्षात येतो, तर एखाद्याचा अर्थ उमगल्यावर हसू अनावर होते. गालातल्या गालात हसवण्यापासून ते खळखळून हसवण्यापर्यंतचा अनुभव देणारे हे लेखन दैनंदिन जीवनातील निरर्थकतेला दूर सारून आनंदाचे क्षण निर्माण करते. पहिल्या भागापेक्षा अधिक विक्षिप्त आणि वेगळ्या ढंगात परत आलेले ‘ब्रह्मेघोटाळा रिटर्न्स’ विनोदाची अनोखी शैली अनुभवू इच्छिणाऱ्या वाचकांसाठी मनोरंजक ठरते.
ललित लेखन
ब्रह्मेघोटाळा रिटर्न्स
₹230.00
लग्न जमवण्यापासून ते लग्नसमारंभातील धावपळ, वऱ्हाडी मंडळींचा आगाऊपणा आणि त्यातून घडणारे घोटाळे यांवर खुमासदार विनोद करणारे ज्युनियर ब्रह्मे यांचे हे लेखन आहे. विक्षिप्त, निरागस आणि अनपेक्षित विनोदांसह स्वनिंदात्मक कोट्यांची मेजवानी देणारे ‘ब्रह्मेघोटाळा रिटर्न्स’ वाचकांना हास्याच्या वेगळ्या वाटेवर घेऊन जाते.
Availability: 10 in stock
| Author | ज्युनिअर ब्रह्मे |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.