वसंताच्या प्रेमात आकंठ बुडालेली कविहृदयाची राणी दिघ्यांच्या घरात सून म्हणून प्रवेश करते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या मनातील प्रेमाची भावना कोमेजल्यासारखी वाटू लागते. जो वसंत कधीकाळी तिच्या जीवनात आनंद फुलवणारा होता, तोच तिला वैशाखातील रखरखत्या उन्हासारखा भासू लागतो. उदात्त प्रेमाच्या शोधात ती नव्या संघर्षाला सामोरी जाते.
या वैयक्तिक कथानकाच्या पलीकडे कादंबरीत स्वातंत्र्योत्तर काळातील नागपूरच्या समाजजीवनाचे मानववंशशास्त्रीय चित्रण आणि मानवी जीवनातील अपूर्णतेवर चिंतनशील भाष्य आहे. ‘अॅना कॅरेनिना’ आणि ‘मादाम बोव्हारी’ यांसारख्या अभिजात कादंबऱ्यांची आठवण करून देणारी कथनवैशिष्ट्ये असूनही ‘चेटूक’ स्वतःचा स्वतंत्र प्रवास घडवते. प्रेम म्हणजे नेमके काय, ते शारीरिक असते की अशारीरिक, आणि केवळ भावुकतेच्या आधारावर मानवी जीवन व समाज समृद्ध होऊ शकतो का, असे प्रश्न ही कादंबरी वाचकांसमोर ठेवते. गुंतवून ठेवणारी, अस्वस्थ करणारी आणि अंतर्मुख होण्यास भाग पाडणारी ही कादंबरी आहे.
कथा-कादंबरी
चेटूक
₹395.00
‘चेटूक’ ही प्रेम, वैवाहिक नातेसंबंध आणि मानवी जीवनातील अपूर्णतेचा वेध घेणारी कादंबरी आहे. वसंताच्या प्रेमात पडलेली राणी लग्नानंतर प्रेमाचा अर्थ नव्याने शोधू लागते. तिच्या भावविश्वातील संघर्षातून प्रीतीचे स्वरूप आणि मानवी नात्यांतील गुंतागुंत यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Availability: 10 in stock
Category: कथा-कादंबरी
| Author | विश्राम गुप्ते |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |
Be the first to review “चेटूक” Cancel reply






Reviews
There are no reviews yet.