पत्र हे व्यक्तीच्या मनातील विचार, भावना आणि व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब असते. भाषणांमध्ये किंवा लेखनात विचार मांडताना काही मर्यादा येऊ शकतात; मात्र पत्रांमधून व्यक्त होणारे विचार अधिक सहज, प्रांजळ आणि नैसर्गिक असतात. त्यामुळे पत्रांमधून व्यक्तीच्या मनातील कळकळ, आपुलकी, चिंता आणि सामाजिक बांधिलकी यांचे दर्शन घडते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सी. ना. शिवतरकर मास्तरांना लिहिलेली पत्रे याच दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. या पत्रांमधून बाबासाहेबांच्या विचारविश्वाचे, त्यांच्या भावनांचे आणि सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचे विविध पैलू उलगडतात. अस्पृश्य समाजाला माणुसकी, समानता आणि न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाबरोबरच राष्ट्रहिताला दिलेले महत्त्वही या पत्रांतून समजते.






Reviews
There are no reviews yet.