मानवाच्या उत्क्रांतीपासून ते आधुनिक राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेपर्यंतचा प्रवास उलगडताना ‘द इंडियन्स’ हा ग्रंथ भारतीय उपखंडाच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या इतिहासाचा अभ्यास करतो. प्राचीन काळापासून भारतात झालेली मानवी स्थलांतरे, विविध समुदायांचे आगमन आणि त्यांच्या परस्परसंवादातून घडलेली सांस्कृतिक जडणघडण यांचा यात चिकित्सक आढावा घेतला आहे.
भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना जनुकशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, हवामानशास्त्र आणि भाषाशास्त्र यांसारख्या वैज्ञानिक ज्ञानशाखांचा आधार घेतला आहे. त्यामुळे इतिहासातील प्रचलित समजुती आणि नव्याने समोर येणारे पुरावे यांचा विचार करण्याची संधी वाचकांना मिळते.






Reviews
There are no reviews yet.