इतिहासाच्या पानांवर आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचे जीवन म्हणजे जिद्द, कल्पकता, समर्पण आणि ध्येयपूर्तीचा प्रेरणादायी प्रवास असतो. दीपा देशमुख लिखित ‘दिग्गज २’ या पुस्तकातून अशाच असामान्य व्यक्तींच्या जीवनाचा आणि कार्याचा परिचय करून दिला आहे. त्यांच्या विचारांनी आणि योगदानाने जगाच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली, तसेच पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचे मार्ग खुले झाले.
साहित्य, कला, विज्ञान, गणित, स्थापत्य, चित्रकला, शिल्पकला, संगीत, समाजकारण आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा मागोवा या पुस्तकात घेतला आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रतिभा, कामाप्रती असलेली निष्ठा आणि स्वतःच्या क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न यांतून त्यांच्या यशामागील प्रेरणा समजून घेता येते.






Reviews
There are no reviews yet.