औपचारिक शिक्षणपद्धतीमुळे शिकण्याच्या प्रक्रियेला एक निश्चित दिशा मिळाली; मात्र कालांतराने त्यात साचेबद्धपणा आणि कृत्रिमता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन मुलांच्या गरजा, आवडी आणि शिकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेचा विचार करणे आवश्यक ठरते.
रेणू दांडेकर लिखित ‘होम स्कूलिंग’ या पुस्तकात होम स्कूलिंग, ओपन स्कूलिंग, डीस्कूलिंग, अनलर्निंग आणि लोकशाहीवादी शिक्षण अशा पर्यायी शिक्षणविषयक संकल्पनांची चर्चा केली आहे. शिक्षण कसे नसावे, यावर टीका करण्यापुरते मर्यादित न राहता ते कसे असावे, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.






Reviews
There are no reviews yet.