इलोनवरचा संघर्ष

₹375.00

‘इलोनवरचा संघर्ष’ ही स्त्री-पुरुष संबंधांवर आणि त्यांच्या सहजीवनावर भाष्य करणारी कल्पित विज्ञानकादंबरी आहे. इलोन ग्रहावर अनेक शतकांपासून स्वतंत्रपणे राहणाऱ्या स्त्री आणि पुरुषांमधील शांतता सीनीच्या मृत्यूनंतर भंग पावते आणि निर्णायक संघर्षाची शक्यता निर्माण होते.

Availability: 10 in stock

पृथ्वीवर कधीकाळी एकमेकांचे साथीदार असलेले स्त्री आणि पुरुष इलोन ग्रहावर वेगवेगळ्या समूहांत राहू लागले आहेत. त्यांनी स्वतंत्र शहरे वसवली आहेत, अमरत्व प्राप्त केले आहे आणि मीलनाशिवाय संतती निर्माण करण्याचे तंत्रज्ञानही विकसित केले आहे. अनेक शतकांपासून टिकून असलेली त्यांच्यातील शांतता सीनीच्या मृत्यूनंतर धोक्यात येते.
दोन्ही समूह पुन्हा युद्धाच्या आणि निर्णायक संघर्षाच्या उंबरठ्यावर उभे राहतात. इतकी वर्षे टिकलेली शांतता खरी होती की केवळ संघर्षातील एक दीर्घ विराम, असा प्रश्न निर्माण होतो. या संघर्षाचे परिणाम विनाशकारी ठरू शकतात. प्रत्यक्ष युद्ध होते का, विनाश टळतो का आणि दोन्ही समूहांचे भविष्य काय असते, याची उत्सुकता कादंबरीतून निर्माण होते. कल्पनारम्य सामाजिक रचनेच्या माध्यमातून स्त्री-पुरुष संबंध, सहजीवन आणि संघर्ष यांचा विचार मांडणारी ही कादंबरी आहे.

Author

इंद्रायणी चव्हाण

Publisher

रोहन प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इलोनवरचा संघर्ष”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top