आजच्या बदलत्या जीवनशैलीत मुलांचे बालपण सुरक्षित आणि आनंदी ठेवणे हे पालकांसमोरील महत्त्वाचे आव्हान बनले आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात घडणाऱ्या बाललैंगिक शोषणाच्या घटनांची गंभीरता लक्षात घेऊन, ससून हॉस्पिटलमध्ये बालशल्यविशारद म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मीनाक्षी भोसले यांनी प्रतिबंधात्मक जनजागृतीचा उपक्रम हाती घेतला. प्रत्यक्ष उपचारांबरोबरच समुपदेशन, माहितीपुस्तिका आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या पालकांपर्यंत आणि समाजापर्यंत हा विषय पोहोचवत आहेत. या पुस्तकात बाललैंगिक अत्याचारांचे विविध प्रकार, त्यांच्याशी संबंधित गंभीर सामाजिक समस्या व रूढी, अत्याचार टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि अशी घटना घडल्यानंतर घ्यावयाची काळजी या चार विभागांतून विषयाची सविस्तर मांडणी केली आहे. मुलांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाची जाणीव करून देणे, त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणे आणि संकटाच्या वेळी योग्य मदत मिळवून देणे यांसारख्या बाबींविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक उपयुक्त आहे. मुलांचे निरागस बालपण जपण्यासाठी पालक, शिक्षक आणि समाजातील प्रत्येकाने वाचावे असे हे मार्गदर्शक पुस्तक आहे.
सामाजिक
जपूयात निरागस बालपण
₹125.00
बाललैंगिक शोषणाचे प्रकार, त्यामागील सामाजिक समस्या आणि अत्याचार रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय यांची माहिती देणारे मार्गदर्शक पुस्तक. डॉ. मीनाक्षी भोसले यांनी पालक आणि समाजात जागरूकता निर्माण करून मुलांचे निरागस बालपण सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.