जेपीज भटकंती टिप्स

₹200.00

जयप्रकाश आणि जयंती प्रधान अर्थात ‘जेपीज्’ यांच्या ७८ देशांच्या भटकंतीतून मिळालेल्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक परदेशी सहलीचे नियोजन करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन करते. सहलीचे नियोजन कसे करावे, कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात, याविषयीच्या व्यावहारिक टिप्समुळे प्रवास अधिक आनंददायी, सुरक्षित आणि सुकर करण्यास मदत होते.

Availability: 10 in stock

Category:

प्रवासाची आवड माणसाचे आयुष्य कसे बदलू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जयप्रकाश आणि जयंती प्रधान यांचे ‘जेपीज्’ दाम्पत्य. १९९८ मध्ये युरोपची पहिली सहल केल्यानंतर त्यांनी एका मागोमाग एक देशांची भटकंती सुरू केली आणि आजपर्यंत तब्बल ७८ देशांना भेट दिली. या ऑफबीट प्रवासातून त्यांना विविध देश, संस्कृती आणि पर्यटनाचे अनेकविध अनुभव मिळाले. या अनुभवांच्या आधारे पर्यटनाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी विकसित झाली आणि सहलीचे नियोजन करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, कोणत्या चुका टाळाव्यात, याचे व्यावहारिक ज्ञान त्यांना मिळाले. त्यातूनच हे मार्गदर्शक पुस्तक साकार झाले आहे. परदेशी सहलीची तयारी, योग्य नियोजन आणि प्रवासादरम्यान घ्यावयाची काळजी यांसंबंधी उपयुक्त टिप्स देणारे हे पुस्तक नवोदित तसेच अनुभवी पर्यटकांसाठी मार्गदर्शक ठरते. परदेशात काय करावे, काय टाळावे आणि अधिक जबाबदार व सुजाण पर्यटक कसे व्हावे, याविषयीचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Author

जयप्रकाश प्रधान,जयंती प्रधान

Publisher

रोहन प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जेपीज भटकंती टिप्स”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top