रामायणातील कैकयीला केवळ खलनायिका म्हणून न पाहता, तिच्या भावना आणि मनातील संघर्ष समजून घेण्याचा प्रयत्न शिरवाडकरांनी या नाटकातून केला आहे. दशरथाने दिलेले वचन विसरल्याची जाणीव झाल्यावर तिच्या मनात निर्माण होणारा क्रोध आणि रामाविषयी असलेले मातृप्रेम यांतील गुंतागुंत नाटकात उलगडते. रामाचा विवेकी स्वभाव आणि कैकयीच्या मनातील बदल यांमुळे नाटकाचा शेवट मातापुत्रांच्या मनोमीलनाने होतो. या शिरवाडकर जन्मशताब्दी विशेष आवृत्तीत वाल्मीकी रामायणाशी नाटकाच्या कथावस्तूचे नाते स्पष्ट करणारा श्री. शं. सराफ यांचा लेख आणि मुकुंद कुलकर्णी यांचे टिपण समाविष्ट आहे.
नाटक
कैकयी
₹150.00
कैकयी हे वि. वा. शिरवाडकर यांचे रामायणातील कैकयीच्या व्यक्तिरेखेवर आधारित नाटक आहे. कैकयीच्या मनातील भावभावना, रामाविषयीचे मातृप्रेम आणि भरताशी असलेले नाते यांचे संवेदनशील चित्रण यात केले आहे.
Availability: 10 in stock
| Author | वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) |
|---|---|
| Publisher | पॉप्युलर प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.