निवांत आणि सुखासीन जीवन जगणारा, कोणतेही निश्चित ध्येय नसलेला श्रीराम भारतीच्या प्रेमात पडतो. बुद्धिमान, तडफदार आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित असलेल्या भारतीमुळे त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलते. दोघांच्या स्वभावातील फरकामुळे त्यांच्या संवादांत खुसखुशीत जुगलबंदी अनुभवायला मिळते.
या कादंबरीत महात्मा गांधी यांची व्यक्तिरेखा विविध पैलूंमधून उलगडते. स्वातंत्र्यलढ्यातील लोकप्रिय नेते, भारतीचे मार्गदर्शक आणि श्रीरामच्या वैयक्तिक आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे व्यक्तिमत्त्व अशा स्वरूपांत गांधीजी समोर येतात. रंजक व्यक्तिरेखाचित्रण, मार्मिक विनोद आणि उत्कंठावर्धक प्रसंग यांच्या माध्यमातून आर. के. नारायण स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी प्रभावीपणे मांडतात.
कथा-कादंबरी
महात्म्याच्या प्रतीक्षेत
₹260.00
आर. के. नारायण यांची ही कादंबरी श्रीराम आणि भारती यांच्या प्रेमकथेच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे चित्रण करते. भारतीच्या प्रेमात पडल्यामुळे श्रीरामच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळते आणि तो स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होतो.
Availability: 10 in stock
Category: कथा-कादंबरी
| Author | उल्का राऊत |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |
Be the first to review “महात्म्याच्या प्रतीक्षेत” Cancel reply






Reviews
There are no reviews yet.