रोडमास्टर बाईकवरून मुंबईच्या रस्त्यांवर सुसाट फिरणारा अगस्ती तपासासाठी सज्ज झाला की, कुठेतरी एखादे गूढ उलगडणार याची चाहूल लागते. तंत्रज्ञानाची जाण असलेला, सौंदर्याचा भोक्ता, खवय्या आणि साहसी वृत्तीचा अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने आणि माणसांच्या मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने गुंतागुंतीच्या प्रकरणांचा छडा लावतो.
मुंबईत निकिता शर्मा या तरुणीच्या खुनापासून सुरू झालेला तपास अगस्तीला हिमाचल प्रदेशात घेऊन जातो. तिथे मिळालेल्या धाग्यांमुळे तो गडचिरोलीतील सिरोंचा गावात पोहोचतो. वेगवेगळ्या ठिकाणांतील घटनांचा परस्पर संबंध शोधताना अखेरीस एका प्रसिद्ध चित्रकाराने पूर्वी चितारलेल्या न्यूड पेंटिंगचे रहस्य समोर येते. अनपेक्षित वळणे, गूढ धागेदोरे आणि अगस्तीची तपासपद्धती यांमुळे ही कथा वाचकाला शेवटपर्यंत गुंतवून ठेवते.
कथा-कादंबरी
न्यूड पेंटिंग @ 19
₹120.00
अगस्ती या चतुर आणि साहसी गुप्तहेराच्या तपासाभोवती गुंफलेली ही रहस्यकथा आहे. मुंबईतील निकिता शर्मा या तरुणीच्या खुनापासून सुरू झालेला तपास हिमाचल प्रदेशमार्गे गडचिरोलीतील सिरोंचा गावापर्यंत पोहोचतो. या घटनांमागे एका प्रसिद्ध चित्रकाराने पूर्वी चितारलेले न्यूड पेंटिंग असल्याचे उघड होते.
Availability: 10 in stock
Category: कथा-कादंबरी
| Author | श्रीकांत बोजेवार |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |
Be the first to review “न्यूड पेंटिंग @ 19” Cancel reply






Reviews
There are no reviews yet.