आपल्या वाङ्मयीन कार्याने अनेक पिढ्यांना समृद्ध करणाऱ्या लेखकांशी आणि कवींशी प्रवीण दवणे यांचे जिव्हाळ्याचे संबंध जुळले. कधी पत्रव्यवहारातून, तर कधी खासगी आणि अनौपचारिक भेटींमधून ही वाङ्मयीन मैत्री अधिक दृढ होत गेली. या सहवासात त्यांना साहित्यिकांच्या स्वभावाचे विविध पैलू, त्यांच्या मिश्किल टिप्पणी, उत्स्फूर्त उद्गार आणि साहित्यनिर्मितीमागील अथक ध्यास जवळून अनुभवता आला. सहज निसटून गेले असते असे हे अनमोल क्षण दवणे यांनी ‘शब्द जिवलग’ या पुस्तकातून जपले आहेत. कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, गाडगीळ, करंदीकर, पाडगांवकर, व. पु. काळे, शांताबाई, बाबासाहेब पुरंदरे, सुरेश भट आणि द. मा. मिरासदार अशा अनेक प्रतिभावंतांच्या सहवासातून मिळालेला निर्मळ आनंद या लेखनातून व्यक्त होतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळेपण आणि आठवणींमधील आपलेपणा उलगडणारे हे पुस्तक म्हणजे साहित्यिक मैत्रीच्या सुंदर क्षणांना शब्दरूप देणारा हृद्य संग्रह आहे.
ललित लेखन
शब्द जिवलग
₹295.00
प्रवीण दवणे लिखित ‘शब्द जिवलग’ हे मराठी साहित्यविश्वातील ज्येष्ठ लेखक, कवी आणि प्रतिभावंत व्यक्तिमत्त्वांशी जुळलेल्या वाङ्मयीन मैत्रीचे शब्दरूप आहे. कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, शांताबाई, सुरेश भट, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे, मिस्किल टिप्पणींचे आणि अविस्मरणीय क्षणांचे मनोज्ञ दर्शन या पुस्तकातून घडते.
Availability: 10 in stock
| Author | प्रवीण दवणे |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.