टेम्पल टायगर’ या पुस्तकात जिम कॉर्बेट यांच्या कुमाऊँ परिसरातील शिकार मोहिमांचे रोमांचक अनुभव वाचायला मिळतात. एका वाघाची शिकार करण्यात आलेल्या अपयशाच्या कथेसह त्यांनी यापूर्वी न सांगितलेल्या काही शिकारकथाही या पुस्तकात मांडल्या आहेत. ‘मॅन-ईटर्स ऑफ कुमाऊँ’ या गाजलेल्या कथामालिकेची रंजक सांगता या पुस्तकातून होते. हाडाचा शिकारी असूनही कॉर्बेट यांच्या मनात जंगलातील जैवविविधतेविषयी असलेली आस्था आणि संवेदनशीलता प्रत्येक कथेतून जाणवते. त्यांची शारीरिक क्षमता, संयम आणि धाडस वाचकाला थक्क करतात. कुमाऊँ-गढवालमधील प्राणी आणि माणसे यांच्याकडे समान ममत्वाने पाहणाऱ्या जिम कॉर्बेट यांचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचावे.
माहितीपूर्ण
टेम्पल टायगर
₹220.00
जिम कॉर्बेट यांच्या कुमाऊँमधील शिकार मोहिमा, जंगलातील रोमांचक अनुभव आणि वन्यजीवांविषयीची संवेदनशीलता उलगडणारे पुस्तक म्हणजे ‘टेम्पल टायगर’. थरारक शिकारकथांसोबतच निसर्ग, प्राणी आणि माणसांविषयीचे त्यांचे ममत्व या पुस्तकातून अनुभवायला मिळते.
Availability: 10 in stock
| Author | जिम कॉर्बेट, अद्वैत गोखले |
|---|---|
| Publisher | मनोविकास प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.