फ्रेंच विचारवंत प्रा. हिप्पोलित तेन यांनी मांडलेल्या वाङ्मयसिद्धान्ताची जगभरातील अभ्यासकांनी दीर्घकाळ चर्चा आणि चिकित्सक समीक्षा केली आहे. ‘वंश’ (Race), ‘वातावरण’ (Milieu) आणि ‘वेला’ (Moment) ही तेन यांच्या सिद्धान्तातील महत्त्वाची तत्त्वे साहित्यनिर्मिती आणि तिच्या सामाजिक संदर्भांचा विचार करण्यासाठी विशेष उपयुक्त ठरली आहेत. या तत्त्वत्रयीबरोबरच तेन यांनी राष्ट्र आणि राष्ट्रीयता यांविषयीही महत्त्वपूर्ण विचार मांडले आहेत. आज भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, वाङ्मयाच्या सामाजिक अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. दलित, ग्रामीण, भटके, आदिवासी आणि गिरिजन साहित्याच्या अभ्यासातून साहित्यकृतींकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. त्याचबरोबर ‘भारतीय वाङ्मय’ या संकल्पनेचाही गांभीर्याने विचार होत आहे. अशा पार्श्वभूमीवर तेन यांच्या सिद्धान्ताचे पुनर्वाचन महत्त्वाचे ठरते. या पुस्तकातून तेन यांच्या सिद्धान्ताचे यथामूल आणि सुविहित मराठी भाषांतर उपलब्ध होत असून, वाङ्मयाचे विद्यार्थी, संशोधक आणि समीक्षक यांच्यासह मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांतील अभ्यासकांनाही ते उपयुक्त ठरू शकते.
ललित लेखन
तेन यांचा वाङमयसिद्धांत
₹125.00
हिप्पोलित तेन यांच्या प्रसिद्ध वाङ्मयसिद्धान्ताचा परिचय करून देणारे हे पुस्तक आहे. ‘वंश’, ‘वातावरण’ आणि ‘वेला’ या तत्त्वत्रयीसह राष्ट्र, राष्ट्रीयता आणि वाङ्मयाच्या सामाजिक अभ्यासाविषयीचे तेन यांचे विचार मराठी भाषांतरातून समजून घेण्याची संधी यातून मिळते.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. सुरेश धायगुडे ,द.दी. पुंडे |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.