या संग्रहातील पहिल्या कथेत जुन्या वस्तूंचे संग्राहक पार्वतीचरण यांच्या नातवाचा पोपट पिंजऱ्यातून अचानक गायब होतो. फेलूदा त्याच्या शोधासाठी घरी पोहोचतो, तेव्हाच पार्वतीचरण यांचा खून होतो आणि मौल्यवान ‘नेपोलियनचे पत्र’ही गायब होते. पोपटाच्या पिंजऱ्यावर सापडलेले रक्ताचे डाग या प्रकरणातील रहस्य अधिक गडद करतात. पोपटाचे गायब होणे, खून आणि पत्राची चोरी यांचा परस्पर संबंध शोधण्याचे आव्हान फेलूदासमोर उभे राहते.
दुसऱ्या कथेत चित्रकार चंद्रशेखर यांना भेट मिळालेले टिंटोरेट्टोचे मौल्यवान चित्र कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. चित्राच्या वारसाहक्कावरून संबंधित व्यक्तींची हालचाल सुरू असतानाच घरातील एका म्हाताऱ्या कुत्रीचा खून होतो. तपासादरम्यान फेलूदाला ते चित्र बनावट असल्याचे समजते. खऱ्या चित्राचा शोध घेत तो थेट हाँगकाँगला पोहोचतो. चोरी, बनावट कलाकृती आणि अनपेक्षित घटनांनी भरलेल्या या दोन्ही कथा वाचकांची उत्कंठा टिकवून ठेवतात.
कथा-कादंबरी
टिंटोरेट्टोचा येशू आणि १ कथा
₹160.00
‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ हा रोहन प्रकाशनाच्या लोकप्रिय रहस्यकथा मालिकेतील संग्रह आहे. या दोन कथांमध्ये पोपटाच्या गायब होण्यामागचे रहस्य, खून, मौल्यवान पत्राची चोरी आणि प्रसिद्ध चित्रकार टिंटोरेट्टोच्या चित्राची बनावट प्रत यांचा शोध घेताना फेलूदाचे बुद्धिचातुर्य आणि तपासकौशल्य अनुभवायला मिळते.
Availability: 10 in stock
Category: कथा-कादंबरी
| Author | अशोक जैन |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |
Be the first to review “टिंटोरेट्टोचा येशू आणि १ कथा” Cancel reply






Reviews
There are no reviews yet.