वामनाने तीन पावलांत तिन्ही लोक व्यापल्यानंतर चौथे पाऊल कुठे ठेवायचे, असा प्रश्न बळीराजाला विचारला होता. आज विज्ञानही माणसासमोर असाच प्रश्न उभा करत आहे. अवघे विश्व व्यापून टाकणाऱ्या विज्ञानाचे पुढचे पाऊल उद्या कुठे पडणार, आणि त्या प्रवासात माणसाचे स्थान काय असेल, याचा शोध ‘वामनाचे चौथे पाऊल’ या कथासंग्रहातून घेतला आहे. विज्ञानकथेच्या माध्यमातून भविष्याचा वेध घेणाऱ्या या कथा विज्ञानाची माहिती सोप्या भाषेत समजावून सांगण्यापुरत्या मर्यादित नाहीत. त्यांचा केंद्रबिंदू विज्ञान नसून माणूस आहे. विज्ञानाच्या प्रगतीसोबत बदलणारे मानवी जीवन, भविष्यातील माणसाचे अस्तित्व आणि त्याच्याशी निगडित प्रश्न यांचा विचार या कथांमधून मांडला आहे. त्यामुळे हा संग्रह केवळ विज्ञानाच्या शक्यतांचा विचार करत नाही, तर उद्याच्या माणसाच्या कथा सांगत भविष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देतो.
ललित लेखन
वामनाचे चौथे पाउल
₹250.00
‘वामनाचे चौथे पाऊल’ हा विज्ञानकथेच्या माध्यमातून भविष्याचा वेध घेणारा कथासंग्रह आहे. विज्ञानाने अवघे विश्व व्यापल्यानंतर त्याचे पुढचे पाऊल कुठे पडणार, या प्रश्नाचा शोध घेताना या कथा विज्ञानापेक्षा माणसाला केंद्रस्थानी ठेवतात. उद्याच्या माणसाचे जीवन, त्याचे अनुभव आणि भविष्यकाळातील मानवी अस्तित्व यांचा वेध घेणारे हे लेखन आहे.
Availability: 10 in stock
| Author | सुबोध जावडेकर |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.