या सम हा

₹460.00

थोरले बाजीराव पेशवे यांच्या अद्वितीय युद्धनेतृत्वाचा, वेगवान घोडदळाच्या प्रभावी वापराचा आणि कल्पक व्यूहरचनांचा या ग्रंथात आढावा घेतला आहे. कमी साधनसामग्रीतही शत्रूवर विजय मिळवणाऱ्या आणि मराठा साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या या अजिंक्य सेनानीच्या पराक्रमाचे दर्शन यात घडते.

Availability: 10 in stock

Category:

थोरले बाजीराव पेशवे यांनी तरुण वयात पेशवेपदाची जबाबदारी स्वीकारून आपल्या पराक्रमाने आणि युद्धकौशल्याने मराठा साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. प्रचंड तोफखाना नसतानाही त्यांनी वेगवान घोडदळ, रणांगणाची अचूक निवड आणि भौगोलिक परिस्थितीचा कुशल वापर करून अनेक विजय मिळवले. त्यांच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीतील विविध मोहिमा, प्रभावी व्यूहरचना आणि सरदारांपासून सैनिकांपर्यंत सर्वांना सोबत घेऊन विजय मिळवण्याची क्षमता या ग्रंथात सविस्तर मांडली आहे. जागतिक स्तरावर गौरवले गेलेल्या या अजिंक्य सेनानीच्या असामान्य युद्धनेतृत्वाचा परिचय करून देणारा हा ग्रंथ आहे.

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Author

मेजर जनरल शशिकान्त पित्रे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “या सम हा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top