अनुभवी पोलीस अधिकारी राजेंद्र मुरलीधर भामरे यांच्या धडाडीच्या आणि कल्पक तपासावर आधारित हे पुस्तक गुन्हेगारी जगतातील अनेक पैलू उलगडते. चोरी आणि दरोड्यांपासून सायबर गुन्ह्यांपर्यंत बदललेल्या गुन्हेगारीचे स्वरूप तसेच खबरे, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि व्हिसेरा यांचे तपासातील महत्त्व यात स्पष्ट केले आहे. परिस्थितीचा अभ्यास, लोकसंपर्क आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलीस अधिकारी सत्यापर्यंत कसे पोहोचतात, हे या सत्यकथांमधून समजते. त्याचबरोबर सायबर साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करणारे हे पुस्तक गुन्हेगारी तपास आणि वास्तववादी सत्यकथांमध्ये रस असणाऱ्या वाचकांसाठी उपयुक्त आहे.
माहितीपर
ओन्ली वन क्लू
₹340.00
सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुरलीधर भामरे यांनी तपासलेल्या ३३ गुन्ह्यांच्या सत्यकथा या पुस्तकात वाचायला मिळतात. गुन्हेगारांचा शोध, निरपराधांचे संरक्षण, तपासातील पुरावे आणि बदलत्या गुन्हेगारीचे स्वरूप यांचा वास्तववादी वेध यात घेतला आहे.
Availability: 10 in stock
| Author | राजेंद्र मुरलीधर भामरे |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.