भारतीयांच्या प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या रेल्वेचे कामकाज नेमके कसे चालते, याविषयीचे कुतूहल या पुस्तकातून शमवले जाते. रेल्वेच्या इंजिन्सपासून डबे, रुळ, स्लीपर्स, सिग्नल यंत्रणा, तंत्रज्ञान आणि विद्युत पुरवठ्यापर्यंत अनेक तांत्रिक बाबींची माहिती यात दिली आहे. रेल्वे यार्ड्स, व्यवस्थापन, आधुनिकीकरण आणि रेल्वे व्यवस्था कार्यान्वित ठेवणाऱ्या मनुष्यबळाचाही यात समावेश आहे. रेल्वेप्रेमी, जिज्ञासू वाचक आणि भारतीय रेल्वेच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक एका छोटेखानी ज्ञानकोशाप्रमाणे उपयुक्त ठरते.
माहितीपर
रेल्वे : भारताची जीवनरेखा
₹595.00
भारतीय रेल्वेची विशाल यंत्रणा, तंत्रज्ञान आणि दैनंदिन कारभार यांची अभ्यासपूर्ण माहिती देणारे हे पुस्तक आहे. इंजिन्स, डबे, रेल्वेमार्ग, सिग्नल यंत्रणा, विद्युत पुरवठा, व्यवस्थापन आणि आधुनिकीकरण अशा रेल्वेशी संबंधित विविध विषयांचा यात आढावा घेतला आहे.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. शिरीष यंदे, हेमंत जोगदेव, आशिष कुवेलकर |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.