शास्त्रीय संगीताच्या परंपरेचा आदर राखत त्याच्या अभिव्यक्तीला नवे आयाम देणाऱ्या नीला भागवत यांचा संगीतप्रवास या पुस्तकातून उलगडतो. ख्याल गायनातील पारंपरिक बंदिशींच्या चौकटीपलीकडे जाऊन मानवी सहभावना आणि समतेचा विचार मांडणाऱ्या त्यांच्या प्रयोगांविषयी त्या स्वतःचे अनुभव आणि विचार व्यक्त करतात. संतसाहित्यातील प्रेम, करुणा, एकता आणि मानवधर्म या मूल्यांचा त्यांच्या संगीतावर झालेला प्रभावही यात समजतो. आपल्या संगीतप्रवासात प्रेरणा देणाऱ्या व्यक्ती आणि गुरूंची कृतज्ञतापूर्वक रेखाटलेली व्यक्तिचित्रे या पुस्तकाला अधिक समृद्ध करतात. शास्त्रीय संगीताकडे नव्या आणि बहुआयामी दृष्टिकोनातून पाहू इच्छिणाऱ्या वाचकांसाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
माहितीपर
गायनाचे रंगी
₹295.00
ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल गायिका नीला भागवत यांनी शास्त्रीय संगीतात केलेले अभिनव प्रयोग आणि त्यामागील विचार या पुस्तकातून मांडले आहेत. संतसाहित्य, प्रेम, करुणा, समता आणि मानवधर्म यांपासून प्रेरणा घेऊन त्यांनी घडवलेल्या संगीतविश्वाची ओळख यातून होते.
Availability: 10 in stock
| Author | नीला भागवत |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.