आपलं विश्व

₹1,095.00

लेखक सुकल्प कारंजेकर यांनी या सचित्र ग्रंथातून विश्वाच्या उत्पत्तीपासून त्याच्या भवितव्यापर्यंतचा रंजक आणि अभ्यासपूर्ण प्रवास उलगडला आहे. विश्वशास्त्रातील वैज्ञानिक संकल्पना, विविध संस्कृतींमधील उत्पत्तिकथा आणि विश्वातील मानवी स्थान यांची माहिती सोप्या मराठीत दिली आहे.

Availability: 10 in stock

विश्वाचा उगम कसा झाला, त्याचा अफाट पसारा किती व्यापक आहे आणि या विश्वात मानवाचे स्थान काय, अशा मूलभूत प्रश्नांचा शोध या पुस्तकातून घेतला आहे. हजारो वर्षांपासून विविध संस्कृतींनी मांडलेल्या उत्पत्तिकथा आणि आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने विश्वाची रहस्ये उलगडण्याचे सुरू असलेले प्रयत्न यांची रंजक मांडणी लेखक सुकल्प कारंजेकर यांनी केली आहे. वैज्ञानिक संकल्पना सोप्या मराठीत समजावून सांगताना विज्ञानाबरोबरच साहित्य आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनांचाही समावेश केला आहे. विश्वशास्त्राविषयी कुतूहल असणाऱ्या कुमारांपासून प्रौढ वाचकांपर्यंत सर्वांसाठी ज्ञानवर्धक आणि उद्बोधक ठरणारा हा सचित्र ग्रंथ आहे.

Author

सुकल्प कारांजेकर

Publisher

रोहन प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आपलं विश्व”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top