स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक समस्या, आव्हाने आणि मोठी स्वप्ने घेऊन भारताने नव्या प्रवासाला सुरुवात केली. पुढील सुमारे ६५ वर्षांत देशाच्या वाटचालीला दिशा देणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण घटना आणि घडामोडी घडल्या. ‘असा घडला भारत!’ या ग्रंथात स्वातंत्र्योत्तर भारताच्या या प्रवासाचा विविध अंगांनी मागोवा घेण्यात आला आहे. सुरुवातीच्या काळातील मूलभूत बदल, राजकारण आणि समाजकारणातील स्थित्यंतरे, अर्थव्यवस्था व उद्योगक्षेत्रातील प्रगती, विज्ञानातील घडामोडी, तसेच विकास आणि अधोगतीचे विविध पैलू यांचा यात समावेश आहे. भारताच्या वाटचालीवर परिणाम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय घटनांबरोबरच चित्रकला, नाट्य, चित्रपट आणि क्रीडाविश्वातील बदलांचेही चित्र या ग्रंथातून उभे राहते. जनजीवनावर परिणाम करणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि मोठ्या दुर्घटनांचाही यात वेध घेतला आहे. गतकाळातील घटनांकडे शक्य तितक्या तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न करणारा हा ग्रंथ केवळ जुन्या आठवणींना उजाळा देत नाही, तर त्या घटनांचे नव्याने आकलन करण्याची संधी देतो. ज्यांनी हा काळ अनुभवला आहे त्यांना भूतकाळाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहता येते, तर नव्या पिढीला देशाच्या इतिहासाचे नेमके भान आणि समकालीन घटनांचा अन्वयार्थ समजून घेण्यास मदत होते. भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा समग्र पट उलगडणारा हा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे.
पुरस्कारप्राप्त
असा घडला भारत (जनआवृत्ती)
₹1,150.00
‘असा घडला भारत!’ हा ग्रंथ स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील सुमारे ६५ वर्षांच्या प्रवासाचा विविधांगी वेध घेतो. राजकारण, समाजकारण, अर्थव्यवस्था, उद्योग, विज्ञान, कला, चित्रपट, क्रीडा आणि नैसर्गिक आपत्ती अशा विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण घटना व बदलांचा तटस्थ आढावा घेणारा हा ग्रंथ वाचकांना देशाच्या जडणघडणीचे समग्र भान देतो.
Availability: 10 in stock
| Author | सुहास कुलकर्णी |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.