लोकशाहीवादी अम्मीस…दीर्घपत्र

₹320.00

चित्रपट-दिग्दर्शक सईद मिर्झा यांच्या ‘लोकशाहीवादी अम्मीस… दीर्घपत्र’ या साहित्यकृतीतून धर्मनिरपेक्ष लोकशाही, भारतीय समाजजीवन, सांस्कृतिक वारसा आणि समकालीन राजकीय-सामाजिक वास्तवाचा वेध घेतला आहे. दीर्घपत्राच्या अनोख्या रूपबंधात कादंबरी, आत्मकथन, परिकथा, प्रवासवर्णन, चित्रपट-संहिता आणि वैचारिक संवाद यांचा सर्जनशील संगम साधणारे हे पुस्तक वाचकाला इतिहास, संस्कृती आणि मानवी नात्यांच्या विश्वात अंतर्मुख करणारा प्रवास घडवते. मूळ इंग्रजी साहित्यकृतीचा मराठी अनुवाद मिलिंद चंपानेरकर यांनी केला आहे.

Availability: 10 in stock

‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है?’ यांसारख्या चित्रपटांद्वारे समांतर चित्रपट चळवळीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे सईद मिर्झा यांनी ‘लोकशाहीवादी अम्मीस… दीर्घपत्र’ या आपल्या पहिल्याच इंग्रजी साहित्यकृतीत लेखनाच्या रूपबंधाचा अभिनव प्रयोग केला आहे. दीर्घपत्राच्या स्वरूपात लिहिलेल्या या पुस्तकात कादंबरी, परिकथा, आत्मकथन, समाजचित्र, राजकीय वाद-संवाद, संस्कृतीविषयक चिंतन, प्रवासवर्णन आणि चित्रपट-संहिता अशा विविध लेखनप्रकारांचं सर्जनशील मिश्रण आढळतं.

Author

मिलिंद चंपानेरकर

Publisher

रोहन प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लोकशाहीवादी अम्मीस…दीर्घपत्र”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top