आठवणी आजीच्या

₹140.00

‘आठवणी आजीच्या’ हे ‘आजोळचे दिवस’ मालिकेतील पुस्तक असून, आजीच्या प्रेमळ सहवासातून मिळणारी माया, ऊब, संस्कार आणि आयुष्य घडवणारे अनुभव यांचे भावस्पर्शी चित्रण यातून उलगडते. मोनिका गजेंद्रगडकर, शुभदा चौकर, राधिका आपटे, शाहू पाटोळे, नितीन आरेकर, अनिल साबळे आणि राजीव खांडेकर यांनी आजीविषयीच्या आपल्या आठवणी आणि अनुभव शब्दबद्ध केले आहेत.

Availability: 10 in stock

काही नाती जन्मत:च प्रेम, माया आणि विश्वासाच्या भक्कम पायावर उभी असतात. आजीचे नातेही असेच जिव्हाळ्याचे आणि मनाला ऊब देणारे असते. तिच्या तलम प्रेमाची सर कशालाच येत नाही. मायेची दुलई पांघरून प्रेमाने गोंजारणारी आजी प्रसंगी कणखर होऊन आयुष्याचे महत्त्वाचे धडेही शिकवते. तिच्या अनुभवांच्या खजिन्यातून मिळणारे संस्कार आणि प्रोत्साहन आयुष्याला नवी दिशा देतात. ‘आजोळचे दिवस’ या मालिकेतील ‘आठवणी आजीच्या’ या पुस्तकात मोनिका गजेंद्रगडकर, शुभदा चौकर, राधिका आपटे, शाहू पाटोळे, नितीन आरेकर, अनिल साबळे आणि राजीव खांडेकर यांनी आजीशी जोडलेल्या नात्याचे विविध भावस्पर्शी पैलू उलगडले आहेत. आजीच्या सहवासातील गोड आठवणी, तिचे प्रेम, तिचा कणखरपणा आणि तिच्याकडून मिळालेले आयुष्याचे धडे यांचा अनुभव देणारे हे पुस्तक वाचकांना आपल्या आजीच्या आठवणींशी पुन्हा जोडते.

Author

अरुण शेवते

Publisher

रोहन प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आठवणी आजीच्या”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top