स्नेहा अवसरीकर यांच्या या पहिल्याच कथासंग्रहात मानवी नात्यांचे विविध पैलू संवेदनशीलतेने उलगडले आहेत. काका-पुतण्यातील आत्मीयता, एकटेपणातून निर्माण होणारे भावबंध आणि अनपेक्षितपणे जुळणारी नाती अशा अनेक अनुभवांचे चित्रण यात आहे.
काही कथा नात्यांमधील विश्वास, तर काही भावनिक गुंतागुंत, दुरावा आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव यांचा वेध घेतात. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर नाती कशी जुळतात, बदलतात आणि कधी संपतात, हे लेखिका प्रभावीपणे मांडतात. या तरल आणि हळव्या कथा वाचकांना स्वतःच्या आयुष्यातील नात्यांच्या आठवणींशी जोडतात.






Reviews
There are no reviews yet.