एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती

₹340.00

पृथ्वीच्या दक्षिण आणि उत्तर ध्रुवांवरील अद्भुत प्रदेशांची सफर घडवून आणणारे ‘एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती’ हे पुस्तक म्हणजे निसर्ग, लोकजीवन आणि अनोख्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा रोमांचक प्रवास आहे. प्युर्टो विल्यम्स, केप हॉर्न, अंटार्क्टिका, फॉकलंड आयलंड, आर्टिक सर्कल, ग्रीनलँड आणि आइसलँड अशा विलक्षण ठिकाणांचे जिवंत चित्रण या पुस्तकात अनुभवायला मिळते.

Availability: 10 in stock

Category:

पृथ्वीच्या ग्लोबवर दक्षिणेकडील अंटार्क्टिका आणि उत्तरेकडील आर्टिक हे बर्फाच्छादित प्रदेश पाहताना तिथे नेमकं काय असेल, असा प्रश्न मनात येतो. तब्बल ७८ देशांची अनोखी भटकंती केलेल्या प्रधान दाम्पत्याने या दोन्ही ध्रुवांवरील प्रदेशांचीही सफर केली आहे. ‘एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती’ या पुस्तकातून तेथील निसर्गसौंदर्य, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि लोकजीवनाचा वेध घेत वाचकांना एका वेगळ्याच जगाची ओळख करून दिली आहे. पृथ्वीच्या दक्षिण टोकावरील प्युर्टो विल्यम्स हे गाव, खलाशांचे कबरस्तान म्हणून ओळखले जाणारे केप हॉर्न, सुमारे ९८ टक्के बर्फाने व्यापलेला अंटार्क्टिका आणि अवघ्या तीन हजार लोकवस्तीचे फॉकलंड आयलंड अशा ठिकाणांची वैशिष्ट्ये या प्रवासात उलगडतात. उत्तरेकडील आर्टिक सर्कल, आकाशात रंगांची उधळण करणाऱ्या नॉर्दन लाईट्सचे मनोहारी दर्शन, हिमनगांसाठी प्रसिद्ध ग्रीनलँड आणि ‘लँड ऑफ फायर अँड आइस’ म्हणून ओळखले जाणारे आइसलँड यांचाही या सफरीत समावेश आहे. पृथ्वीच्या दोन टोकांवरील या अनोख्या प्रदेशांचे अनुभव, निसर्गाची विविध रूपे आणि तेथील जीवनाची वैशिष्ट्ये यांचे रंजक कथन वाचकांना एका अविस्मरणीय आणि थरारक भटकंतीचा अनुभव देते.

Author

जयप्रकाश प्रधान

Publisher

रोहन प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top