इत्रनामा

₹350.00

ही कथा आहे पंचविशीतल्या नाझियाची—तिच्या पत्रकारितेची, सामाजिक जाणिवांची, मैत्रीची आणि प्रेमाची. नाझिया आणि सुमीत यांच्यात प्रेम फुलत असताना धर्म, संस्कार आणि वैयक्तिक आस्था यांमधील संघर्ष त्यांच्या नात्यापुढे प्रश्न उभे करतो. असदच्या निःस्वार्थ प्रेमामुळे या नात्यांची गुंतागुंत आणखी वाढते.

Availability: 10 in stock

नाझिया ही स्वतःच्या विचारांबद्दल आणि आयुष्याविषयीच्या कल्पनांबद्दल स्पष्ट असलेली तरुण पत्रकार आहे. तिच्या आयुष्यात सुमीत येतो आणि दोघेही एकमेकांत गुंतत जातात. मात्र, प्रेमात धर्म आणि जात महत्त्वाचे नाहीत असे मानणाऱ्या तरुणांनाही बालपणापासून मनावर झालेले संस्कार आणि आस्थेचे प्रश्न टाळता येत नाहीत. समजलेली आणि न समजलेली आस्था यांच्यातील संघर्ष त्यांच्या नात्यात गुंतागुंत निर्माण करतो.
दुसरीकडे, नाझियाचा बालपणीचा मित्र असद तिच्या विचारांचा, स्वप्नांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा आदर करतो. तो तिच्यावर मनापासून प्रेमही करतो. अशा परिस्थितीत प्रेम, मैत्री, धर्म, आस्तिकता आणि मानसिक संघर्ष यांचे अनेक पदर उलगडत जातात. वैयक्तिक भावना आणि सामाजिक संस्कार यांच्यात समतोल साधताना तरुणांना कोणत्या प्रश्नांना सामोरे जावे लागते, याचा वेध ही कथा घेते.

Author

हिनाकौसर खान

Publisher

रोहन प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इत्रनामा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top