कँडी क्रश

₹250.00

आजच्या काळातील सामाजिक, धार्मिक, जातीय आणि लैंगिक भेदभावांच्या पार्श्वभूमीवर माणूसपणाचा शोध घेणारा हा दहा कथांचा संग्रह आहे. स्वतःचा शोध, नात्यांमधील गुंतागुंत आणि अनुत्तरित प्रश्नांची उकल यांभोवती फिरणाऱ्या या कथा चिंतनशील, आक्रमक, रंजक आणि अंतर्मुख करणाऱ्या आहेत.

Availability: 10 in stock

माणूसपण हरवत चाललेल्या आजच्या अस्वस्थ काळात प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जगण्याचा अर्थ आणि आपली वाट शोधत आहे. देश, धर्म, जात, लिंग, वर्ण आणि वर्ग यांच्या भिंती माणसांमधील अंतर वाढवत असताना ‘माणूस’ या संकल्पनेसमोर अनेक प्रश्न उभे राहत आहेत. द्वेष, भेदभाव आणि संवेदनशीलतेचा ऱ्हास यांमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीतही सलोखा, शांतता आणि माणुसकी जपणारी वाट शोधण्याची आशा कायम आहे. अशाच समकालीन प्रश्नांभोवती फिरणाऱ्या या दहा कथा मानवी जीवनातील संघर्ष, विचार आणि भावविश्वाचे विविध पैलू उलगडतात. स्वतःचा शोध घेणारी माणसे, नात्यांमधील लपंडाव संपवण्याचा प्रयत्न आणि मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची धडपड या कथांमधून अनुभवायला मिळते. काही कथा चिंतन करायला लावतात, काही सामाजिक वास्तवावर थेट भाष्य करतात, तर काही रंजक व अनपेक्षित वळणांतून वाचकांना विचारप्रवृत्त करतात. मानवी संवेदनशीलता, नातेसंबंध आणि आजच्या काळातील गुंतागुंतीचे प्रश्न यांचा वेध घेणारा हा कथासंग्रह वाचकांना माणूसपणाच्या अर्थाचा नव्याने विचार करायला प्रवृत्त करतो.

Author

नीरजा

Publisher

रोहन प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कँडी क्रश”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top